Wednesday, February 1, 2023

पर्यटकांसाठी खुशखबर ! जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

- Advertisement -

औरंगाबाद – पर्यटनाची आवड असलेल्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे शनिवार व रविवारी देखील खुली राहणार आहेत. म्हणजेच आता जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पूर्णवेळ खुली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरुळ लेणी, अजिंठा लेणी आणि दौलताबाद किल्ला आदी पर्यटनस्थळे सुर्योदय ते सुर्यास्त केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या नियमित वेळेप्रमाणे चालू ठेवण्यासाठी मुभा राहिल.

- Advertisement -

सर्व पर्यटन स्थळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक असेल. या सर्व नियमांचे पालन करणे नागरिकांचे तसेच प्रशासनाची जबाबदारी असेल.