हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पैसे कमावण्याची ईच्छा प्रत्येकालाच असते. त्यासाठी प्रत्येक जण कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतो. आजकाल शेअर बाजारातील गुंतवणुकीचा कल वाढतो आहे. मात्र अनेकांना नक्की कुठल्या मध्ये शेअर्समध्ये पैसे लावावे हेच काळात नाही. तर त्याविषयी आज आम्ही तुम्हांला माहिती देणार आहोत. गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजारामध्ये मल्टीबॅगर शेअर्स झपाट्याने वाढतच आहे. मल्टीबॅगर शेअर्स म्हणजे कमी गुंवणूकीत भरपूर नफा मिळवून देणारे शेअर्स.
बाजारातील काही शेअर्स हे सातत्याने भरपूर नफा मिळवून देत आहेत. Radhika Jeweltech चे शेअर्स हे अशा शेअर्सपैकी एक आहेत जे सातत्याने भरपूर नफा देत आहेत. 27 एप्रिल रोजी हा शेअर 4.47 टक्क्यांच्या वाढीने 194 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील वर्षी या शेअरने गुंवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत. 28 एप्रिल, 2021 रोजी हा शेअर 16 रुपयांवर होता. आज त्याची किंमत 193.30 रुपये झाली आहे. मागील सहा महिन्यात या शेअर्सने 125 टक्के रिटर्न दिला आहे. मागील एका वर्षात तो 32 टक्क्यांनी वाढलेला आहे. 2022 मध्ये आतापर्यन्त या शेअर्सने 46.71 टक्के रिटर्न दिलेला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअर्स मध्ये एका वर्षांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची किंमत आज 12 लाख 12 हजार 500 रुपये झाली असेल. अशाच प्रकारे जर कोणी सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची किंमत आज 2 लाख 25 हजार 428 रुपये झाली असेल.