लहान मुलांच्या आरोग्यसाठी आरोग्यमंत्र्यांनी उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल; तिसर्‍या लाटेशी लढण्यास सरकार सज्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तो रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. राज्यात या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होऊ शकेल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाचं पाऊल उचललं आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसोबत चार हात करण्यासाठी राज्य सरकार सज्ज झालं असून राज्यात बालरोगचिकित्सा तज्ञ (पीडियाट्रिक) यांची टास्क फोर्स तयार करण्यात येत आहे, असेही टोपे यांनी यावेळी सांगितलं.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत शास्त्रज्ञांनी शक्यता वर्तविल्यानंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या तयारीविषयी आज माहिती दिली. यावेळी टोपे म्हणाले, राज्यात अठरा वर्षे लहान वयोगटात असलेल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने लागणारे बेड, व्हेंटिलेटर हे तयार करून ठेवने आवश्यक आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल रात्री दहा वाजता अनेक पीडियाट्रिक डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यामध्ये अजून कोणकोणत्या उपाय योजना करता येऊ शकतील याविषयी माहिती घेतली आहे.

राज्यात कोरोनाच्या हाहाकारामुळे मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. बाधितांचा आकडा कमी करण्यासाठी राज्यात अनेक जिल्ह्यात कडक लॉककडाउनही लावण्यात आलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांना लसी देण्यासाठीही प्रयत्नही केले जात आहेत. अशा परिस्थितीत आता तिसऱ्या लाटेचा धोखा वर्तविण्यात आला असून त्यात योग्य काळजी घेण्यासाठी व मुलांच्या आरोग्यावर परिणाम न होऊ देण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाय केले जात आहेत.

Leave a Comment