प्रचाराची चुरस वाढली ; मावळमध्ये अशी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची रणनीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून राष्ट्रवादीचे बडे नेते २३ एप्रिलचे मतदान झाल्यापासून मावळ मध्ये तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादीची सर्व प्रतिष्ठा मावळ मध्ये पणाला लागल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. तर शिवसेनेने देखील राष्ट्रवादीला रोखण्यासाठी जंग जंग पछाडले आहे.

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

राष्ट्रवादीचे बडे नेते घरोघर जावून पार्थ पवारला निवडून देण्यासाठी विनंती करत आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावर यांनी काल पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ मावळ मतदारसंघात जाहीर सभा घेतली आहे. त्यात त्यांनी पार्थ पवार यांना आपला आशीर्वाद द्या आणि लोकसभेत तुमच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पाठवा असे आवाहन शरद पवार यांनी  जनतेला केले आहे.

माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

तर शिवसेना देखील कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला आघाडी घेऊ देत नाही. त्यामुळे मावळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मुकाबला अतितटीचा होत चालला आहे. जुन्या जाणत्या शिवसैनिकांची नाराजी दूर करून त्यांना  शिवसेनेच्या पाठींशी खंबीरपणे उभा करण्याचे काम सध्या पक्षाचे नेते करत आहेत.  शिवसेनेचे उपनेते रविंद्र मिर्लेकर यांनी पिंपरी चिंचवड येथे शिवसेना पदाधिकार्यांची भेट घेवून त्यांना शिवसेनेचा प्रचार करण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी नेत्याचे भन्नाट विधान ; अमोल कोल्हेंची बॉडी बघून त्यांना मिठीच मारू वाटते

राष्ट्रवादीच्या पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचा रंगणारा सामना शेवटी काय निकाल देणार याची उत्सुकता मतदानाआधी पासूनच सबंध महाराष्ट्राला लागली आहे. त्यामुळे शिवसेना आपला बालेकिल्ला राखणार का? कि राष्ट्रवादी बाजी मारणार याचा फेसला २९ एप्रिलला जनता करणार आहे तर तो आपल्याला २३ मे रोजी समजणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा

छगन भुजबळांवर टीका करण्याएवढे तुम्ही मोठे नाही ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोल

विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार

म्हणून सैराटमधील तो कलाकार माढ्यात करू शकला नाही मतदान

माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज

लोकसभा मतदान : दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज होणार मतयंत्रात बंद

Leave a Comment