परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
तंत्रज्ञान व बाजारपेठ स्वातंत्र्याच्या दिशेने केंद्र सरकारने पहिले पाऊल टाकल्याचे दिसून येत आहे.गेल्या ४० वर्षांपासून शेतकरी संघटना मागणी पुर्णत्वास जात असुन यापुढे स्व.शरद जोशी टास्क फोर्सचे अध्यक्ष असतावेळी तयार केलेला अहवाल शेती व्यवसायासाठी लागू करणे गरजेचा आहे. असे मत शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी व्यक्त केले. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या ८५ व्या जयंती व स्व . विनोद दुबे यांच्या स्मृतीदिनी जिंतूर तालूक्यातील कौसडी येथे आयोजीत श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळीयुवा आघाडी तालुकाध्यक्ष हनुमान आमले, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष सय्यद कलीम पटेल, सोशल मिडीया प्रमुख संतोष गबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना देशमुख म्हणाले कि,शरद जोशी यांनी आयुष्यातील पस्तीस वर्ष शेतकरी व शेतीव्यवसायातील अनंत अडचणी शोधून त्या दूर करण्यासाठी सुख-समाधानाचे वैभवशाली जीवन त्याग करित घरावर तुळशीपत्र ठेवत आयुष्याचा होम पेटविला . शेवटच्या श्वासापर्यंत शेतीव्यवसायाला भरभराटीचे दिवस यावेत यातून भारतातील अर्थव्यवस्थेला वेगळी कलाटणी मिळण्यासाठी शरद जोशी यांनी काम केले. शेती व्यवसायासाठी त्यांनी सुचविलेल्या सर्व विचारांची आज सुद्धा तेवढीच नितांत गरज आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान कार्यक्रम ठिकाणी स्व . शरद जोशींची प्रतिमा रांगोळीतून ज्ञानेश्वर बर्वे यांनी साकारली होती. यावेळी शेतकरी संघटनेचे नंदकुमार जीवने, माणिकराव घुगे ,विनायकराव देशमुख, कैलास गबाळे, विश्वनाथराव देशमुख, उद्धव डोंबे ,नागेश कड, शरद देशमुख व पंडितराव जगताप यांच्यासह जिल्हातील शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते .मोसिन काझी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’