ऑनलाइन रेशन कार्ड बनवण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रेशन कार्ड हे आजच्या काळात एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती रेशन कार्डमध्ये असते. लोकांना रेशन कार्डद्वारे रेशन देखील मिळते. रेशन कार्डचे दोन प्रकार आहेत. आपण रेशन कार्ड कसे मिळवू शकता ते जाणून घ्या.

यासाठी अर्ज कसा करावा ?
1 रेशन कार्डसाठीचा अर्ज जवळच्या रेशन कार्ड कार्यालयातून घेता येतो किंवा अन्न पुरवठा आणि ग्राहक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा राज्याच्या वेबसाईटवरूनही डाउनलोड करता येतो.

2 रेशन कार्डसाठी, आपण ज्या राज्यात आहात त्या राज्याच्या वेबसाइटवर रेशन कार्डसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

3 रेशन कार्डचे 2 प्रकार आहेत. पहिले दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी आणि दुसरे दारिद्र्य रेषेवरील लोकांसाठी. आपण कोणत्या श्रेणीत मोडता त्या आधारावर रेशन कार्ड मिळवू शकता. तुम्ही https://nfsa.gov.in/portal/apply_ration_card  या वेबसाइटला भेट देऊन रेशन कार्ड मिळवू शकता.

4 रेशन कार्डसाठी माहिती भरा. यासाठीची माहिती योग्यरित्या भरा कारण जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तपशील देखील चुकीचा असेल. यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडा.

5 या अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडा आणि आवश्यक असलेली अर्ज फी भरा. जर तुम्ही BPL / AAE कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागेल.

6 हा अर्ज जवळच्या कार्यालयात सबमिट करा. 15 दिवसांनंतर रेशन कार्ड घरी येईल.

7 भारताचा नागरिक रेशन कार्ड बनवू शकतो.

8 ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, कर्मचारी ओळखपत्र, मतदार ओळखपत्राद्वारे तुम्ही तुमचे रेशन कार्ड सहजपणे मिळवू शकता.

Leave a Comment