सर्वात फास्ट इंटरनेट स्पीड देईल Jio ची ही खास ऑफर; पहा किती पैसे मोजावे लागतील

jio offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| JIO कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळ्या ऑफर्स, प्लॅन्सची घोषणा करत असते. हे प्लॅन्स ग्राहकांसाठी परवडणारे देखील असतात. आता पुन्हा एकदा Jio ने AirFiber Plus युजर्ससाठी नवीन ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरमार्फत युजर्सला 60 दिवस तिप्पट इंटरनेट स्पीड मोफत मिळेल. यामुळे सर्व युजर्सला कोणत्याही अडथळ्याशिवाय IPL ही म्हणून स्वतः पाहता येईल. त्यामुळे जिओने AirFiber Plus वर आणलेली ही ऑफर नक्की काय? जाणून घेऊया.

Jio च्या ऑफरविषयी माहिती..

Jio AirFiber Plus च्या या ऑफर मध्ये युजर्सला इंटरनेट स्पीड सर्वात फास्ट देण्यात येईल. हे स्पीड जून्या स्पीडपेक्षा तिप्पट फास्ट असेल. Jio AirFiber Plus ही ऑफर 16 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. या ऑफर अंतर्गत जिओच्या जुन्या युजर्सला स्पीड अपग्रेड संबंधित एक मेसेज पाठवला जाईल. महत्वाचे म्हणजे ही ऑफर फक्त त्याच युजर्ससाठी उपलब्ध असेल जे युजर्स Jio AirFiber Plus प्लॅन वर 6 ते 12 महिन्यांपासून आहेत. या ऑफरमुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय यूजर्सला इंटरनेट वापरता येईल.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, Jio AirFiber ची ही ऑफेर Jio Fibre FTTH (फायबर टू द होम) युजरसाठी नसणार आहे. या ऑफरमार्फत जिओ युजर्सला आयपीएल 2024 च्या स्ट्रीमिंग दरम्यान बेस्ट एक्सपीरियंस देईल. या ऑफरमार्फत JioCinema सर्व IPL 2024 चे सामने 4K रिजोल्यूशनमध्ये मोफतमध्ये स्ट्रीम करता येणार आहेत. तसेच, युजर्स कंपेटिबल 4K टीव्ही आणि डिस्प्लेवर मॅच पाहू शकतात. त्यामुळे तुम्हाला देखील या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर त्वरीत रिचार्ज करा.