नरेंद्र मोदी अन् अडवाणींसोबत रामायणातील सीताचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दूरदर्शनवरील बहुचर्चित टीव्ही सीरियल ‘रामायण’ या देशव्यापी लॉकडाऊनच्या दरम्यान परत दाखविण्यात येते आहे तेव्हापासूनच या शोचे प्रमुख कलाकार आजच्या तरूण पिढीमध्ये लोकप्रिय होत आहेत.या शोमध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांचे एक जुने छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या छायाचित्रामध्ये दीपिका पीएम नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत बसलेली दिसत आहे.

सीताने स्वत: ट्विट केले हे छायाचित्र
दीपिकाने हा फोटो स्वतः ट्विटरवर शेअर केला आहे. दीपिका वडोदरा येथून निवडणूक लढवत होती तेव्हाचे हे ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र आहे. तिने हे छायाचित्र शेअर केले आणि लिहिले की, ‘जुना फोटो, जेव्हा मी वडोदरा येथून निवडणुक लढवत होते त्यावेळेचा.पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या बरोबर उजव्या बाजूला कोपऱ्यात बसले आहेत, त्यानंतर लालकृष्ण अडवाणी, मी आणि निवडणूक प्रभारी नलिन भट्ट.

दीपिका चिखलिया यांनी ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारून एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवली.या सीरियलमध्ये त्यांना अरुण गोविल, भगवान राम, दारा सिंह हनुमान आणि अरविंद त्रिवेदी रावण म्हणून सहभागी झालेले होते.

जनतेच्या मागणीवरून ‘रामायण’ परत प्रसारित
कोरोना विषाणूमुळे देशातील लॉकडाऊनमुळे बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीही लॉक केले गेले आहे.त्यामुळे टीव्ही सीरियलचे नवीन भाग बनवले जात नाहीत. अशा परिस्थितीत लोकांच्या मागणीवरुन रामानंद सागर यांची ही प्रसिद्ध मालिका ‘रामायण’ डीडी नॅशनलवर परतली आहे. तर आजकाल या शोच्या कलाकारांचीही चर्चा चांगलीच गाजत आहे. ही ८०च्या दशकातली सर्वाधिक पाहिलेली मालिका होती. आजही देशभरात कोट्यावधी लोक ही मालिका पाहत आहेत आणि तिचा टीआरपीदेखील खूप जास्त आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

Leave a Comment