Wednesday, June 7, 2023

12 डिसेंबरपासून बदलणार पोस्ट ऑफिसचे ‘हे’ नियम, आजच करा काम; असे न केल्यास आपल्याला भरावे लागेल अतिरिक्त शुल्क

नवी दिल्ली । जर आपले पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर आपल्याला हे नवीन नियम आत्ताच माहित असणे आवश्यक आहे. 12 डिसेंबर 2020 पासून पोस्ट ऑफिसच्या नियमात बदल होणार आहे. या नव्या नियमानुसार ग्राहकांना 11 डिसेंबरपर्यंत पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात (Post Office Savings Account) किमान 500 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. 12 डिसेंबर रोजी ग्राहकांच्या खात्यात किमान शिल्लक नसेल तर तुम्हाला मेंनटेनेंस चार्ज भरावे लागेल.

इंडिया पोस्टने ट्विट केले आहे
इंडिया पोस्टने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. इंडिया पोस्टने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आता पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे.

शिल्लक न ठेवल्याबद्दल द्यावा लागेल एवढा चार्ज
याबाबतची माहिती देताना इंडिया पोस्टने म्हटले आहे की, 11 डिसेंबर 2020 नंतर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर लागू होणारे मेंनटेनेंस चार्ज टाळण्यासाठी आपल्या खात्यात लवकरच किमान 500 रुपयांची शिल्लक ठेवा. अन्यथा आर्थिक वर्षाच्या अखेरीस मेंनटेनेंसच्या नावाखाली खात्यातून 100 रुपये वजा केले जातील.

इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर वार्षिक व्याज दर 4 टक्के आहे. व्याज हे कमीतकमी शिल्लक रकमेच्या आधारे महिन्याच्या 10 व्या आणि महिन्याच्या शेवटच्या दरम्यान मोजले जाते. ग्राहक जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून त्यांच्या सोयीनुसार ते उघडू शकतात.

https://t.co/SJKN3bk0RJ?amp=1

पोस्ट ऑफिसमध्ये खाते कोण उघडू शकते
पोस्ट ऑफिसचे बचत खाते एकट्या प्रौढ व्यक्तीद्वारे किंवा दोन प्रौढ (Joint Acount) किंवा पालकांच्या वतीने अल्पवयीन मुलांद्वारे संयुक्तपणे उघडता येते. 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाने खाते उघडले जाऊ शकते. एका व्यक्तीद्वारे केवळ एक पोस्ट ऑफिस सेव्हिंग खाते उघडता येते.

https://t.co/yOzaVCnnTX?amp=1

मिळतात या सुविधा

> पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटवर ग्राहकांना विविध सुविधा मिळतात-
> खात्यासाठी चेक / एटीएम सुविधा
> नॉमिनेशनची सुविधा
> एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये खाते ट्रांसफर करण्याची सुविधा
> नेटबँकिंग / मोबाइल बँकिंग सुविधा
> ऑनलाईन फंड ट्रान्सफर सुविधा

https://t.co/QPP6dDOOqq?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.