भाविकांसाठी महत्त्वाची बातमी!! 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजमधील हे स्थानक राहणार बंद

0
2
prayagraj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| प्रयागराजमध्ये (Prayagraj) सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी (Mahakumbh) देशभरातून लाखो भाविक येत आहेत. यामुळे शहरा शहरात वाढलेल्या गर्दीचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत आहे. महत्वाचे म्हणजे, प्रयागराज संगम रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर भाविक उतरत असल्यामुळे प्रशासनाने हे स्थानक 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ही गर्दी आणखी वाढल्यास बंदीची मुदत वाढवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश

प्रयागराजचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मांधड यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून प्रयागराज संगम स्थानक बंद ठेवण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने त्यांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे 17 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज संगम रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात यावे.

तसेच, हे स्थानक कुंभमेळा क्षेत्राच्या अगदी जवळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि राज्य रेल्वे पोलिसांना (GRP) अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु आता स्थानक बंद असल्यामुळे यात्रेकरूंना अन्य पर्यायी स्थानकांवर उतरावे लागणार आहे.

दरम्यान, प्रयागराजमध्ये भाविकांची संख्या वाढत असल्याने प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. रविवारी तर सुट्टीचा दिवस असल्याने वाहतूक व्यवस्थेवर आणखीन ताण आला होता. आता महाशिवरात्री जवळ आल्यामुळे कुंभमेळ्यातील गर्दीत प्रचंड वाढ होत चालली आहे. त्यामुळे प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना राबवत आहे.

दुसऱ्या बाजूला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सूचना दिल्या आहेत की, “भाविकांनी रस्त्यावर वाहने उभी करण्याऐवजी अधिकृत पार्किंग व्यवस्था वापरावी, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील. तसेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून इतरांनाही प्रोत्साहित करावे. यामुळे भाविकांना आध्यात्मिक आणि स्वच्छतेचा उत्तम अनुभव मिळेल”