प्रेयसीने धोका दिल्याने 23 वर्षीय तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरातील कोथरूड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीने दिलेला धोका आणि तिच्या मामाच्या सततच्या धमक्यांना कंटाळून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव प्रशांत उर्फ मोन्या दीपक कदम असे आहे. मृत प्रशांतच्या आईच्या फिर्यादीवरून प्रशांतची प्रेयसी आणि तिचा मामा या दोघांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत प्रशांतची कोरोनाच्या काळात नोकरी गेली होती. तो एका मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात काम करीत होता. यादरम्यान प्रशांतचे मागील काही वर्षापासून नऱ्हे परिसरात राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. परंतु या तरुणीच्या मामाला या दोघांचे हे संबंध मान्य नव्हते. यामुळे प्रशांत हा कायम तणावात असायचा . आपली प्रेयसी त्याला सोडून जाईल अशी त्याला सतत वाटायची.

यादरम्यान 15 नोव्हेंबर रोजी प्रशांतच्या घरी प्रेयसीचा मामा आला होता. त्याने आपल्या भाचीचा नाद सोडून दे असे म्हणत प्रशांतला शिवीगाळ करत धमकी दिली होती. या सर्व प्रकारामुळे प्रशांत नैराश्यात गेला होता. त्यानंतर त्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. प्रशांतने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोट लिहिली आहे. या नोट मध्ये “मी मोन्या कदम, मी आयुष्यात प्रेम केलं परंतु प्रेयसीने मला फसवले आणि तिच्या मामाने मला धमकी दिली. त्या मुलीने मला धोका दिला म्हणून मी हे कृत्य केलं” असा मजकूर लिहिलेला आहे.

You might also like