हा तालुका माझ्या आई – बापाने मोठ्या कष्टाने उभा केलाय; इथे तुमचे झेंडे लागू देणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कन्नड हा तालुका माझे वडील स्व. रायभान जाधव व मातोश्री तेजस्विनी जाधव यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला तालुका आहे या ठिकाणी तुमच्या सारख्यांचे झेंडे लागू देणार नाही, असा इशारा देत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन जाधव हे जेल मधुन सुटून आल्यावर काल एका सभेला संबोधित करत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

दानवे यांचे जाधव हे नात्यात जावई असले तरी त्यांच्यात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कलगीतुरा रंगल्याचे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. काही दिवसांपूर्वी दानवे हे माझ्या जीवावर उठले आहेत. त्यामुळे मी आता हिमालयात निघून चाललोय असं वक्तव्य देखील जाधवांनी केलं होतं.

दरम्यान, तालुक्यात निवडून आलेले सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी आपल्या पदाचा अभ्यास पूर्वक उपयोग जनतेच्या विकासा करिता करावा. जनता आपली मायबाप असून मोठ्या विश्वासाने ती आपल्याला मतदान करते त्यामुळेच आपल्याला पदे मिळतात. आसुरी संपत्ती असलेली माणसे उच्च पदावर गेल्यास चांगल्या माणसाला तुरुंगात जावे लागते. असा सल्ला देखील जाधव यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment