नवी दिल्ली । हॅकर्स गेल्या काही काळापासून भारतीय इंटरनेट यूजर्सना लक्ष्य करत आहेत. गेल्या काही दिवसात याची गती वाढली आहे. आता हॅकर्सनी दावा केला आहे की, त्यांनी पेमेंट अॅप मोबिक्विक (Mobikwik) च्या कोट्यावधी भारतीय यूजर्सची (Indian Users) गोपनीय माहिती (Data Hacking) घेतली आहे. या अॅपद्वारे दररोज 10 लाखाहून अधिक व्यवहार केले जातात. सध्या या अॅपसह 30 लाखांहून अधिक व्यापारी कनेक्ट झाले आहेत. त्याचबरोबर त्याच्या ग्राहकांची संख्या 12 कोटींपेक्षा जास्त आहे. मोबिक्विकमध्ये सेक्विया कॅपिटल आणि बजाज फायनान्सची मोठी गुंतवणूक आहे. कंपनी व्हॉट्सअॅप, गुगल पे, फोन पे, पेटीएमची स्पर्धा करीत आहे.
हॅकर्सना डेटा लीकऐवजी कंपनीकडून पैसे घ्यायचे आहेत
याबाबत सायबर सुरक्षा विश्लेषक राजशेखर राजरिया यांनीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (ICERT), पीसीआय मानके आणि पेमेंट टेक्नॉलॉजी कंपन्यांना याबाबत लेखी कळविले आहे. हॅकर्स ग्रुपने जॉर्डनवान यांनी डेटाबेसची लिंक भारतीय वृत्तसंस्था पीटीआयला ईमेल केला आहे. हा डेटा वापरण्याचा आपला हेतू नाही असे या ग्रुपने नमूद केले आहे. या ग्रुपने म्हटले आहे की, आपला हेतू फक्त कंपनीकडून पैसे घेणे हा आहे. यानंतर, तो आपल्या वतीने हा डेटा हटवेल.”
कंपनीने मोबिक्विकच्या डेटाबेसमध्ये हॅकिंग झाला नसल्याचा दावा केला आहे
जॉर्डनवन यांनी डेटाबेसमधून मोबिक्विकचे संस्थापक बिपिन प्रीत सिंह आणि मोबिक्विकचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपासना ताकू यांचे डिटेल्सही शेअर केले आहे. तथापि, मोबिक्विकने हॅकर्सचा दावा खोटा असल्याचा सांगत फेटाळून लावला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की,” आम्ही डेटा सुरक्षा अत्यंत गांभीर्याने घेत आहोत आणि वैध डेटा संरक्षण कायद्यांचे पूर्ण अनुसरण करतो. त्याच वेळी, हॅकर्सच्या ग्रुपने मोबिक्विक क्यूआर कोडची अनेक छायाचित्रे आणि त्यांच्या ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी वापरलेली कागदपत्रेही अपलोड केली आहेत. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम करत असल्याचे मोबिक्विक यांनी म्हटले आहे. कंपनी थर्ड पार्टी द्वारे फॉरेन्सिक डेटा सेफ्टी ऑडिट देखील करेल. तसेच मोबिक्विकची सर्व खाती आणि त्यात जमा रक्कम पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले.