व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

यंदा गणेशोत्सव-दहीहंडी निर्बंधमुक्त होणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील यंदाचे सण निर्बंधमुक्त होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा दिली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दहीहंडी, आणि मोहरम धुमधडाक्यात होणार आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, कोरोना काळात इच्छा असूनही आपल्याला सण साजरे करता आले नाहीत. पण यंदा आपण सणांवरील निर्बंध हटवत आहोत. मात्र कायदा सुव्यवस्थेच पालन करत शांततेत हे सर्व उत्सव पार पाडा अस आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच पोलिसांना देखील याबाबतच्या सूचना दिल्या आहेत अस शिंदे म्हणाले.

गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा हटवली आहे. त्यामुळे कितीही उंचीची मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता. तसेच गणेश मंडळाच्या नोंदणी शुल्कातही कपात करण्यात आली आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.  मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत, यासाठी खेटे घालायला लागू नये, म्हणून एक खिडकी योजना आणि ऑनलाइन परवानग्या दिल्या आहेत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.