टीम हॅलो महाराष्ट्र | खगोलप्रेमींसाठी २०२० हे वर्ष आनंदाचं असणार आहे. कारण या वर्षात आपल्याला तब्बल ६ ग्रहण आपल्याला बघायला मिळणार आहेत. यांमध्ये २ सूर्यग्रहण आणि ४ चंद्रग्रहणांचा समावेश असेल. या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण १० जानेवारीला म्हणजे आज पहायला मिळेल. याची वेळ नेमकी काय असेल हे जाणून घेऊयात.
पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज एकूण ४ तास ५ मिनिटे चंद्रग्रहण दिसेल. रात्री ११ वाजून ३७ मिनिटाला चंद्रग्रहण सुरू होऊन मध्यरात्री २ वाजून ४२ मिनिटांनी हे चंद्रग्रहण समाप्त होईल.
हे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील आहे. ग्रहणाच्या वेळी चंद्र धूरकट दिसेल. हे चंद्रग्रहण भारतासह युरोप, अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर आशियाई देशातही दिसेल.
२०२० मधील आगामी ग्रहणे :-
५ जून – चंद्रग्रहण
२१ जून – सूर्यग्रहण
५ जुलै – चंद्रग्रहण
३० नोव्हेंबर – चंद्रग्रहण
१४ डिसेंबर – सूर्यग्रहण
खगोलशास्त्रानुसार ग्रहण ही एक केवळ खगोलीय घटना आहे . परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्यामध्ये येते म्हणून चंद्र झाकला जातो. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणे चंद्रापर्यंत जात नाहीत. त्यावेळी चंद्रग्रहण लागले असे मानले जाते.