Monday, February 6, 2023

भाजपमध्ये गेलेल्या काही जणांना अजूनही मंत्रिपदाच्या शपथेची स्वप्न पडतात; थोरातांचा जयकुमार गोरेंना टोला

- Advertisement -

सातारा । ऐन अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या काही जणांना अजूनही मंत्रिपदाच्या शपथेची स्वप्न पडतात, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना नाव न घेता लगावला. विधानसभेच्या तोंडावर साताऱ्यातील माण खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सातारा येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालायात बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या उपस्थितीत महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस बळकट होत चालल्याचा विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -

“अडचणीच्या काळात काँग्रेसला सोडून मंत्रिपदाची स्वप्न बघत काही मंडळी भाजपमध्ये गेली. मात्र अजूनही त्यांना मंत्रिपदाच्या शपथेची स्वप्न पडत आहेत” असं थोरात जयकुमार गोरेंना अप्रत्यक्षपणे म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांचे काम राष्ट्रीय स्तरावरचे असून ते खासदार झाले पाहिजेत, अशी इच्छाही थोरांतांनी या कार्यक्रमात बोलून दाखवली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in