अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणार 25000 रुपये

Accident Victims
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचाराबद्दल माहिती देताना गुड न्यूज दिली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पहिल्या सात दिवसांसाठी प्रत्येक रस्ते अपघातातील पीडितांना ₹१.५ लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय सेवा मिळेल, तसेच तात्काळ उपचारांसाठी कोणताही आर्थिक अडथळा येऊ नये यासाठी सरकार थेट पैसे देण्याची सुविधा प्रदान करेल. एवढच नव्हे रस्ते अपघातात बळी पडलेल्या अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५००० रुपये मिळणार असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी दिली. राजवीर योजनेंतर्गत हे पैसे मिळतील.

नितीन गडकरी म्हणाले, काही ठराविक भागात पायलट प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आलेली आणि आता देशभरात राबविण्यात आलेली ही योजना राज्य सरकारांच्या मदतीने कोणत्याही सुरुवातीच्या खर्चाशिवाय अपघातग्रस्तांप्रति असलेली काळजी दाखवते. सरकार अशा मॉडेलवर काम करत आहे. जिथे विशेष रुग्णवाहिका दहा मिनिटांत अपघातस्थळी पोहोचू शकतील. अपग्रेड केलेल्या रुग्णवाहिका सेवांसह एकत्रित केलेल्या केंद्रीकृत आपत्कालीन हेल्पलाइनसाठी नितीन गडकरी यांनी योजनांची रूपरेषा मांडली.

‘राहवीर’ योजनेचे फायदे

राज्यांसोबतच्या करारांद्वारे, आधुनिक रुग्णवाहिका अपघातस्थळी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तैनात केल्या जातील, ज्याचा उद्देश प्रमुख क्षेत्रांमध्ये १० मिनिटांपर्यंत पोहचणे हाच असेल. २०२५ च्या सुरुवातीला सुरू झालेल्या ‘राहवीर’ योजनेअंतर्गत, अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवणाऱ्यांना ‘राहवीर’ ही पदवी आणि २५,००० रुपये रोख बक्षीस दिले जाईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी सभागृहाला दिली. रस्ते अपघात हि गंभीर समस्या आहे. स्टॉकहोम घोषणापत्रानुसार २०३० पर्यंत रस्ते वाहतूक मृत्यू आणि जखमींची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याच्या जागतिक उद्दिष्टाप्रती सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी गडकरींनी केली.

योजनेचे उद्दिष्टे आणि फायदे:

पहिल्या ७ दिवसांसाठी रस्ते अपघातातील बळींसाठी रोख रकमेचा उपचार

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना बक्षिसे आणि ओळख

विशेष उपकरणांनी सुसज्ज रुग्णवाहिकांचे जलद वितरण

केंद्रीय हेल्पलाइन आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने त्वरित मदत