हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | काॅंग्रेसने सुरूवातीला स्थानिक स्वराज्य संस्थात ते वेगवेगळे लढणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र लढणार असे बोलतात. तेव्हा आता एकत्र लढले तरी भाजपाचाच विजयी होईल, याचे मोठे उदाहरण कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक आहे. तेथे सर्वजण ठिय्या मांडून बसलेले होते. तरीही 11 हजार मतांनी आम्ही विजयी झालो असल्याचे वक्तव्य ट्विटद्वारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
कराड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात जयवंतराव भोसले यांच्या सहकार पॅनेलने विजय मिळविला होता. डाॅ. सुरेश भोसले, डाॅ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता स्थापन केलेली आहे. या विजयावर पहिल्यादांच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णा कारखान्यातील विजय हा भारतीय जनता पक्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे. आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना यांच्यातून बाहेर पडून भाजपा बरोबर सरकार करणार आहे की नाही हे मला माहिती नाही. परंतु तरीही शिवसेना बाहेर पडणार असली तरी भाजपा स्वतंत्र लढणारच आहोत. आशा देवसकर यांच्यासाठी जागेबाबत आम्ही श्रेष्ठींना सांगणार सरकार बनवा परंतु निवडणूक स्वतंत्रच लढवा.
महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्ष वेगवेगळे लढले तरीही भाजपाचा विजय होईल आणि एकत्र लढले तरीही भाजपाचाच विजयी होईल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुटेसुटे लढल्याने या पक्षांचीच वाताहत होईल आणि त्यानंतर हे पक्ष एकत्र राहतीलच असे नाही. pic.twitter.com/lguJX4Ivo2
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 22, 2021
सुरूवातीला काॅंग्रेस नंतर नवाब मलिक म्हणत होते, आम्ही स्वतंत्र लढणार. आम्ही महाविकास आघाडीचे तीन्ही पक्ष एकत्रित लढले तरी आम्हीच विजयी होवू. महाविकास आघाडी एकत्रित लढले तरी याचे उदाहरण आहे, ते पंढरपूर पोटनिवडणूक आहे. 6 हजार 500 स्थानिक स्वराज्य संस्थातील आमचा विजय आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वजण ठिय्या मांडून बसलेले होते. तरीही भारतीय जनता पक्षाने 11 हजार मतांनी विजय मिळविला. तेव्हा ते वेगवेगळे लढले तर त्यांची वाताहत होईळ. अशा वाताहतीनंतर ते फारकाळ एकत्रित राहतील असे नाही असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.