सांगली जिल्ह्यात पुन्हा हजाराचा आकडा ओलांडला : नवे 1हजार 7 पाॅझिटीव्ह तर 26 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असताना मंगळवारपासून चाचण्यांचे प्रमाणा वाढविण्यात आले. त्यामुळे पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली असून हजाराचा आकडा ओलांडला. चोवीस तासात नवे 1007 रुग्ण आढळले, तर 26 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1472 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 138 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 57, कडेगाव 60, खानापूर 57, पलूस 85, तासगाव 84, जत 77, कवठेमहांकाळ 72, मिरज 122, शिराळा 115 आणि वाळवा तालुक्यात 140 रुग्ण आढळले. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे 10 रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी चाचण्या वाढवण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून सरासरी साडेपाच ते सहा हजार चाचण्यांचे प्रमाण कायम राहिले आहे. मात्र पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी जिल्ह्यात दररोज 7 हजार चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोरोना संशयित जिल्ह्यातील 6 हजार 844 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 2155 पैकी 368 बधित तर 4789 अँन्टीजेन चाचणीमध्ये 681 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1007 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 26 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिरज शहर 1, तासगाव, मिरज व जत तालुक्यात प्रत्येकी 5, वाळवा 3, कडेगाव व शिराळा प्रत्येकी 2, आटपाडी, पलूस व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा काहीसी रुग्णवाढ झाली. नव्याने 138 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 94 तर मिरज शहरात 44 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 57, कडेगाव 60, खानापूर 57, पलूस 85, तासगाव 84, जत 77, कवठेमहांकाळ 72, मिरज 122, शिराळा 115 आणि वाळवा तालुक्यात 140 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 29, कर्नाटक 8, सातारा येथील 5 रुग्ण आढळले. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे 10 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला. आजपर्यंत म्युकरमायकोसीसचे 179 रुग्ण आढळून आले. तर दहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख 19 हजार 374 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 3 हजार 450 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 1 लाख 4 हजार 462 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 11 हजार 462 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून त्यापैकी 9 हजार 60 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.

Leave a Comment