मुलीची छेड काढत तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी; रोडरोमियोची भररस्त्यात दादागिरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | मुलीची छेड काढत तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहारतील एमआयडीसी वाळूज परिसरात घडला. रोडरोमियोची भररस्त्यात सुरु असणारी दादागिरी पाहून नागरिकांनी मध्यस्ती करुन सदर वाद मिटवला. याप्रकरणी घटनेतील आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले आहे.

एमआयडीसी परिसरातील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पायी जात असताना मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या अजय मधुकर चव्हाण रोडरोमियोने रस्त्यात अडवले. यावेळी तू माझ्याशी का बोलत नाही, असे म्हणून तिचा हात धरला. दरम्यान शिवीगाळ करून मारहाण केली.

मुलीच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी….

मुलीचे वडील तिथे आल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यावेळी त्यांनी मुलीला त्या तरुणाच्या तावडीतून सोडवले. यावेळी मुलीचे वडील समजावून सांगत असताना रोडरोमियोने मुलीच्या वड्डीलांनाच जिवे मारण्याची धमकी दिली. भररस्त्यावर हा प्रकार सुरु असल्याने लगतच्या कंपन्यांतील सुरक्षारक्षक व कामगारांनी घटनास्थळ गाठून मध्यस्थी केली.

यापूर्वीही अल्पवयीन मुलीला सदर तरुण आरोपी सतत त्रास देत होता. तो नेहेमी पाठलाग करून मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने थेट वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अरोपीला ताब्यात घेतले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment