टी-२० क्रिकेटमध्ये २४ तासांत ३ हॅटट्रिक्सची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । टी-२० क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अंदाज बांधता येत नाही  इतका जलद या सामन्यांचा फॉरमॅट आहे. टी-२० म्हटलं की नुसती चौकार आणि षटकारांची आतिषबाजी असं सर्वसाधारण समीकरणं पाहायला मिळतं. मात्र, या समीकरणाला छेद देणाऱ्या घटना गेल्या २४ तासांत घडल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय बिग बॅश लीगमध्ये मागील २४ तासात २ तर सुपर स्मॅश लीगमध्ये एका हॅटट्रिक्सची नोंद झाली आहे.

वर्ष २०२० मधील पहिल्या हॅटट्रिकचा मान अफगाणिस्तानच्या रशीद खाननं पटकावला. त्यापाठोपाठ दुसऱ्याच सामन्यात पाकिस्तानच्या हॅरिस रौफनं सलग ३ विकेट्स घेत हॅट्रिक केली. तर आज यात न्यूझीलंडच्या विल विलियम्सची भर पडली आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सुपर स्मॅश लीगमध्ये त्यानं हॅटट्रिक नोंदवली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये अ‍ॅडलेड स्ट्रायकर संघाकडून खेळत रशीद खाननं सिडनी सिक्सर्सविरुद्ध हॅटट्रिक घेत २०२० मधील सर्वप्रथम सलग तीन विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा मान पटकावला. या सामन्यातनंतर मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर्स यांच्यातील लढीतही हॅरिस रौफनंकडून हॅटट्रिक नोंदवली गेली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या हॅरिस रौफनं ही हॅटट्रिक नोंदवली. त्यानं थंडर्सच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवून पुन्हा एकदा संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.


View this post on Instagram

What an outrageously good delivery to send down for your hat-trick ball! #BBL09

A post shared by KFC Big Bash League (@bbl) on Jan 8, 2020 at 3:32pm PST

त्यानंतर विलियम्सनं सुपर स्मॅश लीगमध्ये कँटेरबरी संघाचे प्रतिनिधित्व करताना हा पराक्रम केला. वेलिंग्टन संघाविरुद्धची ही लढत कँटेरबरी संघानं अगदी मोक्याच्या क्षणी अवघ्या ३ धावांनी जिंकली. कँटेरबरीनं ८ बाद १४८ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात वेलिंग्टन संघाला १८ चेंडूंत २३ धावांची गरज होती. त्यांचे पाच फलंदाज शिल्लक होते. पण, विलियम्सनं सामना फिरवला. त्यानं १८व्या षटकाच्या अखेरच्या तीन चेंडूंवर वेलिंग्टनच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. त्यानंतर २०व्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंत दोन फलंदाज बाद करून कँटेरबरीचा विजय पक्का केला. विलियम्सनं १२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.


View this post on Instagram

 

THE MCG IS ROCKING! Haris Rauf takes a hat-trick, can you believe it?! #BBL09

A post shared by KFC Big Bash League (@bbl) on Jan 8, 2020 at 1:56am PST