नाशिक- औरंगाबाद महामार्गावर एसटी दुचाकीचा अपघात, तीन ठार

औरंगाबाद – वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील नाशिक औरंगाबाद महामार्गावर अजित पेट्रोलपंपाजवळ एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.पाच) सायंकाळी घडली.

औरंगाबाद – नाशिक बस (एम एच 14 बीटी 3344) ही खंडाळाकडुन वैजापूरकडे जात होती. तर दुचाकीवरुन (एमएच 20 एफएन 4172) तीन जण वैजापूरकडुन शिऊरकडे जात असताना झालेल्या अपघात दुचाकीवरील तीन जण ठार झाले आहेत. अमोल भाऊसाहेब ठुबे (वय 23, रा.पोखरी, ता.वैजापूर), सोमनाथ साहेबराव निकम (वय 32, रा.शिऊर, ता.वैजापूर), कडुबा ज्ञानेश्वर ठुबे (22, रा.पोखरी, ता.वैजापूर) हे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत गेली.

मात्र यात प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. येथे जमलेल्या नागरिकांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व मृतांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वैजापूर पोलिस ठाण्याचे बीट जमादार रज्जाक शेख, योगेश वाघमोडे, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

 

You might also like