औरंगाबाद | राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून 3 लाखाचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. या पथकाने सात दिवसात दोन कारवाया करत 3 लाख 33 हजार 754 रुपयांचा मूद्येमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांच्या विरोधातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चितेगाव जवळील उड्डाणपूलाखाली एक जण चारचाकीतुन दुसऱ्या देशातील विदेशी दारू विकत असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. यांनतर सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. यावेळी लखन अंबादास पवार (21) हा गाडीतून दारू विकत होता. त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या 170 बाटल्या मोबाईल आणि चारचाकी असा 2.85 लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
त्याचबरोबर दुसऱ्या घटनेमध्ये 15 जुलैला कन्नड तालुक्यातील जवळा येथील राजलक्ष्मी कलेक्शन येथे एक व्यक्ती दारू विकत असताना आढळले. याठिकाणी 517 विदेशी दारूच्या बाटल्या, 37 बिअर आणि 35 लिटर हातभट्टी दारू असा 46 हजार 534 रुपयांचा मुद्येमाल आढळून आला आहे. याप्रकरणी जयस्वाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे पोलीस निरीक्षक विवी रोकडे, जीबी इंगळे, एस आर वाकचौरे, सर्वेश्री गुंजाळ, मोतीलाल बहुरे, रवींद्र मुरडकर, भास्कर काकड, शंकर निसार आणि संजय गायकवाड यांच्या पथकाने केली