सोलापूरमध्ये शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा तळ्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. सानिका गरड, पूजा गरड, आकांक्षा युवराज वडजे अशी मृत पावलेल्या तिघींची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मार्डी गावावर शोककळा पसरली आहे. मार्डी गावात राहणाऱ्या सानिका, पूजा, आकांक्षा या तिघी जणी दुपारी 1 च्या सुमारास रानात जळण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. जळण गोळा करत असताना त्यांना खूप तहान लागली. यानंतर त्या त्या जवळच असलेल्या शेतातील शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेल्या.

या ठिकाणी पाणी पित असताना अचानक या तिघांचा तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या. या तिघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या तिन्ही मुली गरीब कुटुंबातील असल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.

काही दिवसांपूर्वी नांदेडमधील देगलूर तालुक्यातील कावळगड्डा गावामध्येसुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती. यामध्ये शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. अक्षय रोहिदास राजुरे आणि प्रमोद हनुमंत राजुरे अशी मृत मुलांची नावे आहेत. घटनेच्या दिवशी तीन शाळकरी मुले खेळता खेळता गावाजवळील एका शेतात अर्धवट असलेल्या शेततळ्याजवळील गेली. शेततळे तुडूंब भरलेले होते. यापैकी एक मुलगा शौचास गेला तर बाकी दोघे अक्षय आणि प्रमोद शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र तळ्यात गाळ असल्यामुळे हे दोघेही गाळात त्यांचा मृ्त्यू झाला.

Leave a Comment