‘या’ तीन सरकारी बँकांनी ग्राहकांना दिली मोठी भेट, आता दरमहा EMI वे होईल बचत; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील तीन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (PSU Bank) आपल्या ग्राहकांना दिलासा देताना कर्जाचे व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया, यूको बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांनी आपल्या ग्राहकांना भेट दिलेली आहे. आजपासून या बँकांचे नवीन दर लागू करण्यात येत आहेत. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात …

युनियन बँक ऑफ इंडियाने प्रमुख कर्ज व्याज दरात (एमसीएलआर) 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. हे नवीन दर शुक्रवारपासून लागू झालेले आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, एका वर्षाच्या मुदतीच्या कर्जावरील एमसीएलआर हा 7.25 टक्क्यांवरून 7.20 टक्क्यांपर्यंत खाली करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे एक दिवस आणि एका महिन्याच्या कालावधीच्या कर्जावर कपात केल्यानंतर व्याज दर कमी करून 6.75 टक्के करण्यात आला आहे.

दुसरी एक सरकारी बँक असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँक (IOB-Indian Overseas Bank) नेही आपल्या एमसीएलआरमध्ये 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. बँकेने कर्जावरील व्याज दर एका वर्षासाठी 7.65 टक्क्यांवरून 7.55 टक्के केले आहेत. हे दर गुरुवारपासून लागू झाले आहेत.

युको बँकेनेही आपला एमसीएलआरमधील व्याजदर कमी करून 0.05 टक्क्यांवर आणलेला आहेत. त्यानंतर एका वर्षाच्या कर्जावरील दर 7.40 टक्क्यांवरून 7.35 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ही कपात इतर सर्व मुदतीच्या कर्जासारखीच लागू असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like