मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 11 आणि 12 च्या लांबीच्या विस्ताराचं काम अद्याप पूर्ण झालं नाही. त्यामुळे डिसेंबर अखेर पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. मात्र या कामामुळे रेल्वेचे वेळापत्रक बदलले जाणार आहे. याचा परिणाम कोकण रेल्वेवर सुद्धा होताना दिसतो आहे. त्यामुळे जर तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये कोकण रेल्वे प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्या दादर आणि ठाणे स्थानकांपर्यंत डिसेंबरच्या अखेरपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे गाड्यांचा प्रवास दादर आणि ठाणे या स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.
कोणत्या तीन गाडयांवर परिणाम?
बांधकामाचा परिणाम कोकण रेल्वेच्या तीन महत्त्वपूर्ण गाड्यांवर होणार असून या गाड्यांमध्ये मंगळुरू मुंबई, मडगाव ते मुंबई सी एस एम टी तेजस एक्सप्रेस आणि मडगाव मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
मंगळुरू मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस चा 31 डिसेंबर पर्यंतचा प्रवास ठाणे स्थानकावर मर्यादित करण्यात येणार आहे तर मडगाव ते मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि मडगाव मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस 31 डिसेंबर पर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत