ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार : सातारा शहरात सात वाहने उडवली आणि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | 31 डिंसेबर सेलिब्रिशेनला अजून तीन दिवस बाकी असताना. सातारा शहरात मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने तब्बल 7 गाड्यांना धडक दिली आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या थरारक ड्रंक अँड ड्राइव्हचा सीन पहायला मिळाल. त्यानंतर मात्र सातारकरांनी या मद्यधुंद चालकाला चांगलाच चोपला आहे. या अपघातात चारचाकी चार गाड्या आणि तीन दुचाकींना उडवल्यानंतर ही कार अखेर झाडावर आदळली.

सातारा शहरातील राजपथावर सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नगरपालिका ते कमानी हौद या रस्त्यावर हा प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चालकाने कार भरधाव वेगात चालवत होता. यावेळी त्याने चार गाड्या आणि तीन दुचाकींना उडवले. त्यानंतर चालकाला कारमधून बाहेर काढत पादचाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

भरधाव कार कमानी हौदाजवळ आल्यानंतर एका झाडाला धडकली. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या कारमधील चालकाला बाहेर काढून स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप दिला. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी तात्काळ कार चालकास ताब्यात घेतले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सात वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Comment