Friday, January 27, 2023

गंगापूर जवळ ‘द बर्निंग ट्रक’चा थरार !

- Advertisement -

औरंगाबाद – नाशिक येथून औरंगाबाद कडे ऊस घेऊन येणारा मालवाहू ट्रक अपघातग्रस्त होऊन उलटला. त्यानंतर अचानक ट्रक ने पेट घेतला. या आगीत ट्रकसह तब्बल पाच टन कापूस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी औरंगाबाद गंगापूर महामार्गावर घडली. यामुळे गंगापूर जवळ ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार उडाला.

विषयी अधिक माहिती अशी की, ट्रक चालक प्रमोद जाधव हे ट्रक (एम एच 15 इ जि 6318) मधून पाच टन कापूस घेऊन नाशिक येथून औरंगाबादला येत होते. यावेळी गंगापूर जवळ येताच अचानक ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक चा अपघात झाला. जाधव यांनी प्रसंगावधान दाखवत ट्रकमधून उडी घेतल्याने ते थोडक्यात बचावले. त्यांनी या अपघाताची माहिती गंगापूर पोलिसांना दिली.

- Advertisement -

मात्र यादरम्यान अपघातग्रस्त ट्रक ने अचानक पेट घेतला व काही क्षणातच संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. या आगीत ट्रक मधील पाच टन कापूस देखील जळून खाक झाला. ट्रकला आग लावली गेली की लागली, हे मात्र दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.