थरारक घटना : पत्नीचा पाठलाग करून पतीने काढला काटा

सांगली प्रतिनिधी |  मूळ गावी राहण्यास जाण्याच्या कारणावरून झालेल्या पती – पत्नीच्या वादात पतीने पत्नीच्या पोटात चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज सकाळी विटा येथील बर्वे मळ्यानजीक घडली. लिलावतीदेवी नरेश साह असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती नरेश रघुवीर यास ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

बिहार राज्यातील नवादाखास येथील हे परप्रांतीय कुटुंब आहे. लिलावती यांचा पती नरेश हा विटा येथे एका ठेकेदाराकडे सेट्रींग कामगार म्हणून काम करत आहे. तर त्याची मुलगी नवादाखास येथे राहण्यास आहेत. काल लिलावतीदेवी व त्यांची मुलगी रूबीकुमारी विटा येथे पती नरेश यांच्याकडे राहण्यास आले होते. पत्नी लिलावतीदेवी हिने आज सकाळी नरेश यांना आपल्या मुळ गावी राहण्यास चला असे म्हणाल्याने दोघांत वाद सुरू झाला.

या वादात नरेश याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भितीने त्या घरापासून बर्वे मळ्यानजीक असणा-या रस्त्यावर आल्या. पत्नीचा पाठलाग करत नरेशने त्यांना पकडले. पत्नीला खाली पाडून सोबत आणलेल्या चाकूने पोटात वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तत्पुर्वी लिलावतीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

You might also like