Sunday, April 2, 2023

थरारक !! दिल्लीमध्ये छपाकची पुनरावृत्ती; मद्यधुंध तरुणाचा पत्नीवर ऍसिड हल्ला

- Advertisement -

दिल्ली । सतत रोजच्या होणाऱ्या भांडणाला वैतागून एका मद्यधुंध तरुणानं आपल्या पत्नी वर ऍसिड हल्ला केला आहे. त्यामुळे दिल्लीकरांना पुन्हा एकदा छापाक सिनेमाची आठवण झाली. त्या तरुणाने मुलांवर वर सुद्धा ऍसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या ओरडण्याचा आवाजामुळे बाजूचे लोक गोळा झाले. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. लगेच या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली या हल्ल्यामध्ये जखमी झालेली पत्नी आणि तिची तीन मुले याना ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचारासाठी सुरु आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शाहिदने नशेत असताना अचानक भांडणाला सुरुवात झाली. शेवटी वैतागून संतापाच्या भरात हे पाऊल उचललं असं त्याने सांगितलं त्या तरुणाला ऍसिड च्या बाटलीसह पकडण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.

- Advertisement -

या ऍसिड हल्ल्यात पत्नी आणि तीन मुलं जखमी झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोन मुलांची प्रकृती स्थिर आहे. तर चार वर्षांच्या चिमुकल्याची आणि पत्नीची प्रकृती अत्यंत नाजूक असल्यानं त्यांना एम्स मधून हालवून चंद रुग्णालयातून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.