कराड येथे रेल्वेच्या इलेक्ट्रीक लाईनवर तरूणांचा थरारक व्हिडिओ व्हायरल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील रेल्वे स्थानकावर मुख्य इलेक्ट्रिक लाईनवर एक व्यक्ती चढल्याने रेल्वे प्रशासनासह उपस्थितांची चांगलीच भांबेरी उडाली. लाईनवर चढलेला व्यक्ती हा मनोरूग्ण असून तो मूळचा झारखंडचा असल्याची माहीती त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली.

कराड शहराजवळ दोन किलोमीटर अंतरावर ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशन असून शुक्रवारी रंगपंचमी दिवशी दुपारी एका व्यक्ती रेल्वेच्या मेन इलेक्ट्रीक लाईनवर चढलेला होता. तेव्हा सुदैवाने विद्युत प्रवाह बंद असल्याने दुर्घटना घडली नाही. मात्र रेल्वे प्रशासन चांगलेच हदरले होते, त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिस प्रशासनाला सदरील घटनेची माहीती दिली.

रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस व स्थानिक लोकांच्या मदतीने इलेक्ट्रीक लाईनवर चढलेल्या तरूणाला खाली उतरवण्यात यश आले. मात्र मनोरूग्ण तरूणाला खाली उतरविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सदरच्या घटनेचा मोठा व्हायरल झाला असून त्यात युवकांचा जीव वाचविण्यासाठी स्थानिक व प्रशासन यांना मोठे प्रयत्न करावे लागले आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

You might also like