वासोळे ( सातारा) : हॅलो महाराष्ट्र – सातारचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमधून जलजीवन मिशन अंतर्गत वार्षिक कृती आराखडा सन 2021-2022 मध्ये प्रशासनाकडून ग्रामपंचायत वासोळेला 93,29,078 एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तसेच गावामध्ये सार्वजनिक सभामंडपासाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये देण्यात आले आहे. तसेच गावात सार्वजनिक किचन, सार्वजनिक बाथरूम व मुतारी, बंधिस्त गटार यासाठीसुद्धा आ. शशिकांत शिंदे यांनी आपल्या आमदार फंडातून विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे.
याचबरोबर वासोळे गावचे सुपुत्र तसेच वासोळे गावची शान, शांत व संयमी नेतृतव व माजी सरपंच तुकाराम चिमाजी नवघणे यांनी गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 2 गुंठे जागा बक्षिसपत्र करून दिली आहे. त्यांच्या या दानशूरपणामुळे वासोळे ग्रामस्थांकडून त्यांचे आज जाहीर अभिनंदन करण्यात आले आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे गेली कित्येक वर्षे रखडलेली पाणी योजना अखेर आज गावात आली आहे. यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुढाकारामुळे एक पुनर्वसित गाव विकासाच्या दिशेने प्रगती करताना दिसत आहे. या विशेष सहकार्याबद्दल ग्रामस्थ मंडळ वासोळे यांनी आमदार शशिकांत शिंदे आणि वासोळे गावचे माजी सरपंच तुकाराम चिमाजी नवघणे यांचे आभार मानले आहेत. यावेळी उदघाट्च्यानाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे राहुल शिंदे, वनिताताई गोरे, मिलिंद पाटील, किरण नाना साबळे पाटील, बाबासाहेब कदम, वासोळे गावचे सरपंच शोभा संतोष नवघणे, उपसरपंच अंकुश रामचंद्र नवघणे, विठ्ठल जगन्नाथ नवघणे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर कृष्णा नवघणे ,माजी सरपंच तुकाराम चिमाजी नवघणे, माजी सरपंच सचिन नामदेव भोसले, बाबुराव नामदेव नवघणे, माजी सरपंच नामदेव पांडुरंग उभे, राजेंद्र रामचंद्र नवघणे, भिकू आनंदा कोंढाळकर, आनंदा मारुती नलवडे, राजाराम मारुती नवघणे, मारुती रामचंद्र नवघणे, नगरविकास विभाग आयटी डिपार्टमेंटचे संकेत नवघणे, पत्रकार अजय उभे, आणि समस्थ ग्रामस्थ मंडळ वासोळे यावेळी उपस्थित होते.