Monday, February 6, 2023

राज्यात पुढचे 5 दिवस वादळी वार्‍यासह जोरदार पाऊसाची शक्यता; कोणत्या दिवशी कुठे कोसळणार? जाणुन घ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यभरात पुढचे ५ दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

कोणत्या दिवशी कुठे पाऊस पडणार
२५ ते २८ एप्रिल रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह कोल्हापूर, सातारा सांगली या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २५ ते २८ एप्रिल रोजी मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

तसेच २७ व २८ एप्रिल रोजी दक्षिण कोकणमधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग तर उत्तर मध्य महाराष्ट्रमधील पुणे आणि अहमदनगर या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याने पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.