सातारा प्रतिनिधी । सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांवर 225 कॅमेऱ्यांच्या माध्यमातुन 24 तास वॉच ठेवला जात असुन पट्टेरी वाघासह अनेक श्वापद दुर्मिळ प्राणीही कॅमेऱ्यात क्लिक झाले आहेत.
तसेच प्राणी व पर्यावरण अभ्यासकाच्या हाती महत्त्वाची छायाचित्र लागली आहेत. यातून पश्चिम घाटातील समृध्द जैवविविधता अधोरेखित होत असून ही छायाचित्रे अभ्यासकांना पर्वणी ठरत आहेेत. सह्याद्री प्रकल्प व भारतीय वन्यजीव संस्था यांच्यासोबत एका कार्यक्रमांतर्गत संपूर्ण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ग्रीड करून दर दोन किलोमीटर अंतरामध्ये कॅमेरे लावले होते.
या भागात पायी व कॅमेर्यांनी अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासानुसार व्याघ्र प्रकल्पात सांबर व भेकर यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांचे केलेल्या चांगल्या संरक्षणामुळेच ही संख्या वाढल्याचेही दिसून आले आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.