हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्यानं केवळ महिलांसाठी कॅब सर्विस सुरु केली आहे. या कॅब सर्विसची विशेष बाब म्हणजे या कॅबचं सारथ्य प्रशिक्षित महिला ड्राइवर करणार आहेत. ‘वूमन विथ व्हील’ असं कॅब सर्विसच नाव आहे. दिल्लीतील कुठल्याही भागातून महिलांना ही कॅब एका कॉलवर बुक करता येणार आहे. तसेच जयपूर आणि आग्रा ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा या कॅब सेर्विसचा महिलांना लाभ घेता येणार आहे.
केवळ महिलांसाठी सुरु केलेली ही देशातील पहिली कॅब सर्विस आहे. महिलांनी महिलांसाठी सुरु केलेली कॅब सर्विस त्यांना सुरक्षित सेवा देण्यासाठी त्यांच्या सेवेत रुजू झाली आहे. दिल्लीतील नोकरदार महिला, गृहिणी, विद्यार्थिनी यांना या कॅब सर्विसमुळं समाधान व्यक्त करत आहेत. रात्री अपरात्री महिलांना प्रवास करतांना या कॅब सर्विसचा फायदा होणार आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.