१९९३ मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी युसूफ मेमनचा नाशिक कारागृहात मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । मुंबईमध्ये झालेल्या १९९३ मधील बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुविख्यात गुंड टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला युसूफ मेमन (वय ५४) आज सकाळी १०.३० वाजता इसाक सोबत बाथरूम परिसरात ब्रश करत होता. यावेळी युसूफ अचानक कोसळला. त्यामुळे त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा मृतदेह धुळ्याला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी युसूफला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण आजारपणामुळे युसूफला काही काळासाठी जेलबाहेर ठेवण्यात आलं होतं. आजारपणामुळे युसूफला जामिन मिळाला होता. मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनला याआधीच फाशी झाली आहे. तर मुंबई बॉम्बस्फोटाचे मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन अजूनही फरार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”