TikTok कंपनीने भारतातील ‘हे’ दोन व्हिडिओ अ‍ॅप केले बंद; जाणुन घ्या संपुर्ण प्रकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्स आता भारतामध्ये आपले दोन लोकप्रिय व्हिडिओ अ‍ॅप्स बंद करणार आहेत. बाईटडन्सने विगो व्हिडिओ आणि व्हिगो लाइट हे अ‍ॅप्स लवकरच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी, कंपनीने व्हिगो व्हिडिओच्या साइटवर एक पोस्ट टाकून यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटी हे दोन्ही अ‍ॅप्स बंद करणार असल्याची घोषणा केली आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, बाईटडन्सने आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, हे अ‍ॅप बंद केल्याने त्यांना दुःख झाले आहे परंतु या निर्णयाबद्दल त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही आहे. हे अ‍ॅप्स बंद होण्यापूर्वी व्हिगो युझर्स 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत त्यांचे व्हिडिओ टिकटॉकवर एक्सपोर्ट करू शकतात.

भारतात 20 करोड़ टिक टॉक यूजर्स
विशेष म्हणजे, वीगो व्हिडिओ आणि विगो लाइट हे बाइटडन्सचे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप्स आहे. व्हिगो व्हिडिओ आणि व्हिगो लाइट अ‍ॅप हे टिकटॉक सारखेच शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप्स आहेत. या दोन्ही अ‍ॅप्समध्ये, लिप सिंकद्वारे युझर्स आपले व्हिडिओ तयार करतात.

टेकक्रंचच्या एका आकडेवारीनुसार भारतात 20 करोड़पेक्षा जास्त टिकटॉक युझर्स आहेत, तर व्हिगो व्हिडिओमध्ये भारतात 4 मिलियन मंथली अ‍ॅक्टिव्ह युझर्स आहेत. भारतात व्हिगो लाइट वापरणाऱ्यांची संख्या 1.5 मिलियनआहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच बाइटडन्सने म्हटले होते की व्हिगो अ‍ॅपचा भारतात खूप मोठा व्यवसाय आहे.

2017 मध्ये लाँच झाला होता व्हिगो व्हिडिओ अ‍ॅप
कंपनीने हे व्हिडिओ अ‍ॅप सन 2017 मध्ये लाँच केले होते. या प्लॅटफॉर्मवर 15 सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात. डांस, फूड, स्टंट, ब्यूटी, आर्ट, कॉमेडी, म्यूझिक यासारख्या वेगवेगळ्या शैलीतले व्हिडिओ या अ‍ॅप्समध्ये तयार केले जाऊ शकतात. हे दोन्ही अ‍ॅप्स आपल्या शेजारचा देश बांगलादेश आणि इतरही अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र अद्यापही याची पुष्टी झालेली नाही की बाईटडन्स हे अ‍ॅप का बंद करीत आहे. एका प्रवक्त्याने सांगितले की ब्राझील आणि मिडिल ईस्ट मध्ये यापूर्वीच हे अ‍ॅप्स बंद झालेले आहेत. बाईटडन्स हे हॅलो अ‍ॅप देखील ऑपरेट करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment