TikTok च्या भारतीय ऑपरेशन्सच्या विक्रीची तयारी, Glance शी होते आहे चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मागच्या वर्षी भारतात बंदी घातलेली लहान व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप टिकटॉक (TikTok) आता आपल्या भारतीय ऑपरेशन्सची विक्री करण्याच्या विचारात आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनच्या बाईटडन्सने (ByteDance) टिकटॉकच्या भारतीय ऑपरेशन्सची विक्री आपला प्रतिस्पर्धी असलेल्या ग्लांस (Glance) ला विकण्याचा विचार करीत आहे. टिकटॉक ची मूळ मालकी बाईटडन्सची आहे.

सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशनने वाटाघाटी सुरू केल्या
या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या मते, जपानच्या सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पोरेशनने टिकटॉक इंडियाच्या विक्रीसाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. वास्तविक, ग्लांसची मूळ कंपनी इनमोबी (InMobi) आणि टिकटॉकची मूळ कंपनी बाईटडन्स (ByteDance) या दोन्ही कंपन्यांमध्ये सॉफ्टबँकेचा हिस्सा आहे. मात्र, सॉफ्टबँक आणि बाईटडन्सने या प्रकरणात पाठविलेल्या ईमेलला प्रतिसाद दिलेला नाही.

भारत आणि चीनच्या प्राधिकरणाकडून परवानगी घेणे आवश्यक असेल
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, सॉफ्टबँक टिकटॉकची भारतीय मालमत्ता वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि स्थानिक भागीदार शोधत आहे. जर हा करार फायनल झाला तर त्याला भारतीय प्राधिकरणाकडून मान्यता द्यावी लागेल. तंत्रज्ञानाच्या निर्यातीबाबत चीनच्या नव्या नियमांमुळे टिकटॉकच्या विक्रीसाठी चीनच्या अधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी लागेल.

टिकटॉक बंदीनंतर ग्लांसच्या Roposo ची लोकप्रियता वाढली
ग्लांस डिजिटल एक्सपेरिएंस (Glance Digital Experience) एक मोबाइल कंटेट प्लॅटटफॉर्म आहे जो हार्वर्ड बिझिनेस स्कूलचामाजी विद्यार्थी नवीन तिवारी याने लाँच केला आहे. तो देशातील पहिल्या युनिकॉर्न इनमोबीचा संस्थापक आहे. टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Roposo वेगाने लोकप्रिय होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment