मोबाइलचा पासवर्ड अथवा पिन विसरलात? काळजी करू नका, असा काढा यातून मार्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रायव्हसी ही आजच्या काळामध्ये खूप मोठी गोष्ट बनली आहे. काही दिवसापूर्वी प्रायव्हसीला घेऊन व्हाट्सअपच्या प्रायव्हसी पॉलिसीविषयी मोठे वादळ उठले होते. आपल्यासाठी आपला मोबाईल हा प्रायव्हसी संदर्भात मोठा महत्त्वाचा असतो. आपला फोन इतर कुणी पाहू नये म्हणून मोबाईलला पासवर्ड, पिन आणि पॅटर्न वापरले जातात. मोबाईलमधील खाजगीचे व्हिडिओ आणि फोटो कोणीही पाहू नये हा त्यामागे उद्देश असतो. पण जर आपण मोबाईलचा पासवर्ड आणि पॅटर्न विसरून गेला तर याचा आपल्याला मनस्ताप सहन करावा लागतो. आणि त्रास खूप होतो. पासवर्ड विसरलात तर यापासून तुम्ही तुमची कशी सुटका करून घेणार यासाठी आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत. या ट्रिक्स वापरून आपण आपला मोबाईल अनलॉक करू शकणार आहात.

मोबाईल अनलॉक करण्यासाठी काही वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत त्या आपण पाहू,

पहिली ट्रीक – अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी:

अँड्रॉइड फोन स्विच ऑफ करा. एक मिनिटापर्यंत थांबा. त्यानंतर अवाज कमी करण्याचे आणि पॉवर ऑफ करण्याचे बटन एकाच वेळी दाबा. एक मिनिटभर थांबा. असे केल्यानंतर मोबाईलचा डाटा क्लिअर होईल. डाटा क्लीन करण्यासाठी ‘वाईप कॅचे’वर क्लिक करा. एक मिनिट थांबा. आणि परत आपला मोबाईल स्विच ऑन करा. आता तुमचा मोबाईल सुरू होऊन अनलॉक झाला असेल.

दुसरी ट्रीक- पॅटर्न लॉक बायपास:

ही ट्रिक मोबाईलमध्ये डेटा ऑन असेल तरच काम करेल. जर तुमचा डेटा कनेक्शन ऑन असेल तर तुम्ही सहज मोबाईल अनलॉक करू शकता. आपला स्मार्टफोनवर पाच वेळा चुकीचा पॅटर्न ड्रॉ करा. यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल. आणि तीस मिनिटासाठी तुम्हाला थांबायला सांगितले जाईल. त्यामध्ये ‘फरगेट पासवर्ड’ असा पर्याय असेल. यावर क्लिक करा. यात तुमचा रजिस्टर मेल आयडी आणि पासवर्ड टाका. यानंतर तुमचा फोन अनलॉक होईल आणि या नंतर तुम्ही नवीन पॅटर्न ही सेट करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like