TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कार प्रकरणामध्ये अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद : वृत्तसंस्था – टिकटॉक वरून खूप लोक लोकप्रिय झाले होते. टिकटॉक जरी बंद असेल तरी त्यावरील लोकांची लोकप्रियता काही कमी नाही झाली. ह्याच टिकटॉकवर फन बकेट भार्गव या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘टिकटॉक स्टार’ला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित हि चार महिन्यांची गर्भवती आहे. आंध्र प्रदेश पोलिसांकडून फन बकेट उर्फ चिप्पाडा भार्गव याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.

आक्षेपार्ह व्हिडीओवरुन करत होता ब्लॅकमेल
फन बकेट भार्गव याने पीडित तरुणीचे टिकटॉक व्हिडीओ पाहून तिला अनेक ऑफर दिल्या तसेच त्याने तिला प्रपोजसुद्धा केला होता. मात्र पीडित मुलीने त्याला नकार दिला होता. त्यानंतर भार्गवने तुझे आक्षेपार्ह व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असे सांगून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले हि माहिती दिशा सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेम काजल यांच्याकडून देण्यात आली आहे. पीडितेच्या आई वडिलांनी विशाखापट्टणममधील पेंढुर्ती पोलिस स्थानकात फन बकेट भार्गव याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. जेव्हा ती मुलगी ४ महिन्यांची गरोदर राहिली तेव्हा तिच्या कुटुंबीयांसमोर हा प्रकार उघडकीस आला.

‘ओ माय गॉड !’ व्हिडीओमुळे लोकप्रिय
पोलिसांनी फन बकेट भार्गव याला हैद्राबादमध्ये अटक केली आहे. भार्गव हा ‘ओ माय गॉड! ओ माय गॉड!’ सारख्या टिकटॉक व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होता. त्याच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे त्याच्या फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. हि केस पॉक्सो कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे विशाखापट्टणमच्या दिशा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये महिला आणि लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिशा नगर पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. हैद्राबादमध्ये २०१९ मध्ये पशुवैद्यक तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर या दिशा नगर पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली.

भार्गवची कार आणि मोबाईल जप्त
फन बकेट भार्गव याला न्यायालयाने ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी भार्गवची पांढऱ्या रंगाची निसान कार आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी पीडितेचे फोटो सोशल मीडियावर वापरणाऱ्या व्यक्तींविरोधात सक्त कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment