वाचलो! राज्यात नव्या कोरोनाचा संक्रमित एकही रुग्ण नाही; पण… ; राजेश टोपेंनी दिला ‘हा’ इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात नव्या कोरोनाचा (New Covid-19 mutant strain) संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. पण गाफिल राहून चालणार नाही. सरकार सर्व खबरदारी घेत आहे. तुम्हीही काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलं. याशिवाय राज्यात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

देशात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण सापडले आहेत. पण महाराष्ट्रात अजूनतरी नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही. महाराष्ट्रात कोणीही इन्फिल्टेड झालेलं आढळलेलं नाही. पण आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. ब्रिटनमधून आलेल्या प्रत्येक प्रवशांचा स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. आतापर्यंत 43 जणांचे सँपल घेण्यात आले आहेत, असं सांगतानाच नव्या कोरोनाच्या संसर्गावरून महाराष्ट्र सरकार अलर्ट झालं आहे. सरकार अत्यंत गंभीरपणे या प्रकरणात लक्ष घालत आहे. कोणताही निष्काळजीपणा केला जात नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना शोधण्याच्या सूचना
ब्रिटनमधून आलेले काही प्रवासी सापडत नाहीत. हा गंभीर विषय आहे. पोलिसांना या प्रवाशांना शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या प्रवाशांचा शोध सुरू आहे. या प्रवाशांनीही स्वत:हून आरोग्य यंत्रणेसमोर येऊन तपासणी करून घ्यावी, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.

पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नाही

राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. लोक मास्क लावत असून सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. मात्र, नागरिकांनी गाफिल राहू नये. गर्दी करू नये आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment