औरंगाबाद : कोरोनाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून अंशतः लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. त्यातच दुसरीकडे जाधववाडी मंडई देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ग्राहकच नसल्याने शेतकरी त्रस्त झाले असून आज सकाळी चक्क शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली.
एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा पहाता वाढत चालला आहे. प्रतिदिन पाचशेहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे ११ तारखेपासून अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यात बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने बाजार देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर दुसरीकडे जाधववाडी येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून भाजीपाला व्यापारी वर्ग, भाजीविक्रेते घेत असतात. त्याचा फायदा शेतकरी वर्गाला होतो. परंतु अंशतः लॉकडाऊन केल्याने जाधववाडी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे व्यापारी वर्ग, भाजीविक्रेते भाजीपाला घेण्यासाठी देखील आले नाही.
त्यामुळे आता भाजीपाला कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून मंडईत ग्राहकच नसल्याने भाजीपाला फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. काही व्यापारी वर्गाने देखील भाजीपाला रस्त्यावर फेकून दिल्याचे दिसून आले. यामुळे शेतकरी, भाजीविक्रेत्यांना आर्थिक फटका बसला आहे. आधीच अंशतः लॉकडाऊन असल्याने जाधववाडी बंद असल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group