हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tinnitus Disease) मित्रांनो रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या सोबत अनेक प्रसंग, अनेक घटना घडत असतात. त्यांचा आपल्यावर एक विशिष्ट प्रभाव देखील पडत असतो. त्यामुळे कधी कधी एखादी घटना घडून गेल्यानंतर रात्री स्वप्नामध्ये तशीच किंवा त्या संबंधित एखादी घटना दिसणे ही गोष्ट मानसिकरित्या स्वाभाविक मानली जाते. अनेकदा कानात काहीतरी गुंजत असल्याचे जाणवते. काही विचित्र आवाज ऐकू येतात. कानात गजबजणारी संवेदना किंवा कोणतातरी आवाज अनुभवण्याच्या या स्थितीला ‘टिनिटस’ असे म्हटले जाते.
(Tinnitus Disease) ही अवस्था एक प्रकारचा आजार आहे. ज्यामध्ये व्यक्तीला अधून मधून कानात काही विचित्र आवाज ऐकू येतात. अगदी शिट्ट्या वाजणे, पक्षांच्या किलबिलाट, खूप सगळे आवाज किंवा कोणाच्यातरी ओरडण्याचा आवाजदेखील येऊ शकतो. या आजाराविषयी फार क्वचित लोकांना माहीत असल्यामुळे त्याची लक्षणे आणि उपाय याविषयी जागरूकता नाही. चला तर ‘टिनिटस’ या आजाराविषयी सविस्तर माहिती घेऊया.
‘टिनिटस रोग’ म्हणजे काय? (Tinnitus Disease)
टिनिटस रोग म्हणजे कानात गजबजणारी संवेदना किंवा कोणताही अतिरिक्त आवाज. ज्याच्या अचानक येणारा अनुभव त्रासदायी ठरतो. अशा मानसिक स्थितीला ‘टिनिटस’ म्हणता येईल.
टिनिटस रोग होण्याची कारणे
- सायनस इन्फेक्शन
- कानात मैल साचणे
- कानात पाणी जाणे
- कानात संसर्ग होणे
- कानाचा पडदा कमकुवत असणे
- सतत कोलाहल, गडबड, गोंधळ याची सवय असणे
- डोके किंवा मानेची गंभीर दुखापत (Tinnitus Disease)
- क्रॅनियल मज्जातंतूवर परिणाम करणारा आठवा ट्यूमर
- हाय बीपीचा त्रास
- हृदय रोगाची पीडा
- मधुमेहाचा त्रास
- हायपोथायरॉईड
- अधिक ताणतणाव
- औषधांचे दुष्परिणाम
टिनिटस रोगाची लक्षणे
एखाद्या माणसाला टिनिटस रोग झाला असेल तर त्याला सतत कानात कुणीतरी ओरडत असल्याचं जाणवत राहतं. (Tinnitus Disease) शिवाय गजबजलेल्या परिसरासारखा आवाज येणे, कानात शिट्या वाजणे, गर्जना होणे असे वेगवेगळे आणि विचित्र आवाज ऐकू येतात. असे आवाज बराच काळ जाणवू शकतात. ज्यामध्ये कान दुखणे, कान वाहणे आणि मुख्य म्हणजे चिडचिड होणे अशी मुख्य लक्षणे दिसून येतात.
उपचार काय?
वरील लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीने त्वरित डॉक्टरांकडे जाऊन कानांची तपासणी करणे गरजेचे असते. यामुळे वेळीच योग्य ते उपचार घेता येतात. अशा परिस्थितीत डॉक्टर विशेष मशिनरींचा वापर करून कान साफ करून देतात. शिवाय संसर्ग झाला असेल तर त्यावर हायड्रोकोर्टिसन युक्त औषधांच्या कानाच्या थेंबांसह उपचार केला जातो. (Tinnitus Disease)