नवी दिल्ली । आजच्या डिजिटल युगात आपले आयुष्य इंटरनेटवर खूप अवलंबून आहे. फंड ट्रान्सफर आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस/यूपीआय सारख्या इतर ऑनलाइन पेमेंट पद्धतींच्या बाबतीत हे विशेषतः खरे आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे पाठवत असाल आणि अचानक इंटरनेट कनेक्शन गेले तर काय होईल याची कल्पना करा. बरं यासाठी सुद्धा एक उपाय आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. वास्तविक, आपण आपल्या फोनवरून इंटरनेटशिवाय देखील UPI पेमेंट करू शकता. इंटरनेट नसल्यास, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची 99 % सुविधा म्हणजेच NPCI चा खूप उपयोग होईल.
*99# ही NPCI ची USSD आधारित मोबाईल बँकिंग सर्व्हिस आहे, जी नोव्हेंबर 2012 मध्ये सुरू करण्यात आली. सुरुवातीला ही सर्व्हिस फक्त BSNL आणि एMTNL युझर्ससाठी उपलब्ध होती. येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की *99#द्वारे UPI पेमेंट करण्यासाठी, तुमचा फोन नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय, एकाच फोन नंबरवरून भीम अॅपवर वन टाईम रजिस्ट्रेशन करणे देखील आवश्यक आहे.
*99# वापरून पैसे कसे पाठवायचे ?
स्टेप 1- सर्वप्रथम फोनचा डायल पॅड उघडा आणि *99#टाइप केल्यानंतर कॉल बटणावर टॅप करा. हे आपल्याला 7 ऑप्शन्ससह नवीन मेन्युवर घेऊन जाईल. मेन्युमध्ये Send Money, Receive Money, Check Balance, My Profile, Pending Requests, Transactions आणि UPI PIN यासारख्या ऑप्शन्सची लिस्ट असेल.
स्टेप 2- जर तुम्हाला फक्त पैसे पाठवायचे असतील तर डायल पॅडवर क्रमांक 1 दाबून Send Money ऑप्शन निवडा. यानंतर, तुम्ही फोन नंबर, UPI ID किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोड वापरून पैसे पाठवू शकाल.
स्टेप 3- नंतर रक्कम एंटर करा आणि ट्रान्सझॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुमचा 4 किंवा 6 अंकी UPI PIN टाका. मग तुम्हाला फक्त ‘send’ टॅप करायचे आहे.
UPI म्हणजे काय ?
युनिफाइड पेमेंट इंटरफेस / यूपीआय (Unified Payments Interface) ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाईल अॅपद्वारे त्वरित बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते. UPI द्वारे, तुम्ही एका बँक खात्याला अनेक UPI अॅप्ससह लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती चालवली जाऊ शकतात.