तिरुपती बालाजी लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; संपूर्ण देशाचे लक्ष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तिरुपती मंदिरातील (Tirupati Balaji Temple Prasad) प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशाचे ऑइल असल्याच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली होती. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात हे सर्व घडत होते असा आरोप विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघालं. आज या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडणार आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज ३० सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य असेल.

अधिवक्ता सत्यम सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेत, म्हंटल आहे कि, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ट्रस्टच्या गुन्हेगारी कटाची न्यायालयीन किंवा सीबीआय चौकशी करण्यात यावी. तिरुमला येथील लाडू प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी, माशांचे तेल आणि इतर मांसाहारी घटकांचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. हे कृत्य हिंदू धार्मिक प्रथांचे घोर उल्लंघन तर आहेच, शिवाय असंख्य भाविकांच्या भावनाही यामुळे दुखावल्या आहेत. तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात प्राण्यांच्या चरबीची भेसळ करणे हे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराची हमी देणाऱ्या घटनेच्या कलम 25 चे गंभीर उल्लंघन आहे असेही सदर याचिकेत म्हटले आहे.

सरन्यायाधीशांनी तिरुपती मंदिराला भेट दिली

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी रविवारी तिरुमला येथील भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना केली. यावेळी सरन्यायाधीशांनी त्यांच्या नातेवाईकांसह गर्भगृहात प्रार्थना केली. बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर, चंद्रचूड आणि त्यांच्या नातेवाईकांनी रंगनायकुला मंडपम येथे मंदिराच्या पुजाऱ्यांकडून वैदिक आशीर्वाद घेतले. यादरम्यान तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी श्री व्यंकटेश्वर स्वामी आणि तीर्थ प्रसादम यांचा फोटो सरन्यायाधीशांना सादर केला.