“आता पप्पू कोण आहे?” खासदार महुआ मोईत्रांचा मोदी सरकारवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भाजपाच्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेतेमंडळींनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी अनेकदा ‘पप्पू’ या शब्दाचा वापर करतात. यावरून काँग्रेसकडून भाजपवर वारंवार टीका केली जात आहे. यादरम्यान आता तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा (mahua moitra) यांनी एका विषयावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये थेट मोदी सरकारलाच “आता पप्पू कोण आहे?” असा परखड सवाल केला आहे. त्यामुळे आता ‘पप्पू’ हा शब्द संसदेत ऐकायला मिळत आहे. देशाची आर्थिक स्थिती आणि नागरिकत्वाचा त्याग केलेल्या भारतीयांबाबत चर्चा सुरू असताना मोईत्रांनी (mahua moitra) मोदी सरकारवर हल्लाबोल करत असताना या शब्दाचा वापर केला.

“पुरवणी मागण्यांमुळे तिजोरीवर अतिरिक्त भार”
मोईत्रा (mahua moitra) यांनी मोदी सरकारवर टीका करताना अनेक मुद्द्यांवरून टीका केली. “लोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये केंद्र सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त 4.36 लाख कोटींचा भार पडणार आहे. यामुळे देशाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी आणि तुटीच्या रकमेपेक्षाही जास्त ही रक्कम होईल”, असं महुआ मोईत्रा लोकसभेत म्हणाल्या.

नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांचं काय?
यावेळी मोईत्रा (mahua moitra) यांनी नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या भारतीयांच्या संख्येवरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. यासाठी त्यांनी केंद्र सरकारनेच दिलेली आकडेवारी प्रमाण मानून त्यावरून सरकारला परखड सवाल केले. “मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षांच्या काळात जवळपास 12.5 लाख भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला आहे. हे सक्षम अर्थव्यवस्था आणि कररचनेचं लक्षण आहे का? आता पप्पू कोण आहे?” असा सवादेखील मोईत्रा यांनी यावेळी संसदेत उपस्थित केला.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या