TMC Mumbai Recruitment 2024 | आजकाल अनेकांना सरकारी नोकरी पाहिजे असते. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात सगळेजण असतात. तुम्हाला जर सरकारी नोकरी करायची असेल, तर आता आम्ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची एक मोठी संधी उपलब्ध आहे. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अर्ज करताना कोणती अडचण येणार नाही.
टाटा मेमोरियल सेंटरमध्ये (TMC Mumbai Recruitment 2024 विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. याबाबतची अधिसूचना देखील त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 22 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. ही अर्ज पद्धती केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. उशिरा भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
रिक्त पदांचा तपशील
या भरती अंतर्गत कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी, HBNI या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
दरमहा वेतन | TMC Mumbai Recruitment 2024
- कनिष्ठ निवासी – 1,00,800 रुपये प्रति महिना
- वरिष्ठ रहिवासी -1 लाख 21 हजार 200 रुपये प्रति महिना
- HBNI -1 लाख 32 हजार रुपये प्रति महिना
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 40 वर्षे असणे गरजेचे आहे.
अर्ज फी
या भरतीचा अर्ज करण्यासाठी 1000 रुपये फी द्यावी लागेल
नोकरीचे ठिकाण
तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी जॉब करावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
22 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा