सरकारने बैठक घेणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय ; प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणा प्रश्नी राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना पत्र देण्यात आल्यानंतर भाजपकडून टीकास्त्र डागले गेले होते. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यानंतर आता आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आपल्या हालचालीत वाढविल्या आहेत. राज्य सरकारच्यावतीने मराठा समाज उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहात आज बैठक घेण्यात येत असल्याने त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. “सरकारच्यावतीने बैठक घेणं, चर्चा करणं हि म्हणजे वरातीमागून घोडे नाचविणे होय,” अशा शब्दात विरोधी पक्षनेते दरेकर यांनी टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ” मराठा समाज आरक्षण प्रश्नी भाजपकडूनहि बैठक घेतली जाणार आहे.  सरकारच्यावतीने जी बैठक घेतली जात आहे. हे म्हणजे वरातीमागून घोडे नाचविण्याची वृत्ती प्रवृत्ती दिसते. कारण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयात केस सुरु होती. त्यावेळी बैठक घेणे गरजेचे होते. मात्र, तसे केली गेले नाही. आता भाजपकडून पाच लोकांची समिती गठीत केल्यानंतर आरक्षण प्रश्नी बैठकीचे सुरु करण्यात आल्यानंतर आता आपण मागे राहायला नको, या अविर्भावातून त्यांची बैठक होतेय.

या ठिकाणी भाजप हे संपूर्ण ताकदीने मराठा समाजाच्या पाठीशी उभी आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच आरक्षणाचा प्रश्न घेतला गेला. उंचच न्यायालयात ते टिकून दाखवला गेलं. त्यानंतर कुठेही सर्वोच्च न्यायालयाने याला आव्हान दिल न्हवत. दुरदैवाने महाविकास आघाडी सरकार आरक्षणाच्या प्रश्नी कमी पडलं. म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्र्कां ओप्टिल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून त्याची आज बैठक घेतली जातंय. यात फडणवीस एक अहवाल सादर करणार आहेत. असे दरेकर यांनी सांगितले.

You might also like