पाटण तालुक्यात 75 ऑक्सीजन बेड वाढविणार ः ना. शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यात पाटण, दौलतनगर आणि ढेबेवाडी येथील कोरोना उपचार केंद्रामध्ये एकूण 136 ऑक्सीजनचे बेड उपलब्ध आहेत. यामध्ये वाढ करुन दौलतनगर कोरोना उपचार केंद्रामध्ये 25 व पाटण कोरोना उपचार केंद्रामध्ये  50 याप्रमाणे 75 ऑक्सीजन बेड वाढविण्यात येणार आहेत. पाटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय होवू नये. याकरीता कोरोना उपचार केंद्रामध्ये अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यासाठी येत्या आठ दिवसात आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

दौलतनगर (ता.पाटण) येथे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश टोमपे, अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुराडे, पोलीस निरिक्षक निंगाप्पा चौखंडे, उंब्रजचे सपोनि अजय गोरड, कोयनानगरचे सपोनि चंद्रकांत माळी, पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी आदींची उपस्थिती  होती.

पाटणला व्हेन्टिलेटरची सोय करणार :- ना.शंभूराज देसाई

सध्या ऑक्सीजन बेडची सोय आपण पाटण, दौलतनगर व ढेबेवाडी उपचार केंद्रामध्ये करीत आहोत. त्यामुळे ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही. परंतू ज्या रुग्णांना व्हेन्टिलेटरची आवश्यकता आहे. त्यांना सातारा अथवा कराड येथे व्हेन्टिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत. याकरीता पाटण कोरोना उपचार केंद्रात व्हेन्टिलेटरची सोय करणार असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment