हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN-Aadhaar Link : आधार कार्ड हे महत्वाच्या डॉक्युमेंट्स पैकी एक आहे. अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी ते लिंक करावे लागते. जर आपण अजूनही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. हे लक्षात घ्या कि, आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. या तारखेपर्यंत लिंक केले तर फक्त 500 रुपये दंड भरावा लागेल. मात्र या तारखेनंतर लिंक केल्यास 1000 रुपये भरावे लागतील. अशा परिस्थितीत या साठी आपल्याकडे तीनच दिवस शिल्लक आहेत.
पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करावे ते तपासा ??? (PAN-Aadhaar Link)
>> त्यासाठी सर्वांत आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या https://www.incometax.gov.in/iec/portal या नवीन वेबसाइटवर जा. तळाशी असलेल्या आधार लिंक वर क्लिक करा.
>> आपले स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा. येथे तुम्हाला आधार आणि पॅनचा डिटेल्स द्यावे लागतील.
>> जर आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असेल तर पॅन आधार क्रमांकाशी लिंक केलेला दिसेल.
>> जर आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल तर https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आधार लिंकवर क्लिक करा.
>> त्यानंतर डिटेल्स भरा. यानंतर आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल. PAN-Aadhaar Link
दंड भरण्याची प्रक्रिया तपासा …
स्टेप 1: पॅन-आधार लिंकिंगसाठी https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp Protean पोर्टलला भेट द्या.
स्टेप 2: पॅन-आधार लिंकिंग रिक्वेस्टसाठी CHALLAN NO./ITNS 280 वर क्लिक करा.
स्टेप 3: Tax Applicable निवडा.
स्टेप 4: कृपया मायनर हेड 500 (फी) आणि मेजर हेड 0021 (कंपन्यांव्यतिरिक्त इन्कम टॅक्स) अंतर्गत एकच चालानमध्ये फी भरणे सुनिश्चित करा.
स्टेप 5: नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटची पद्धत निवडा.
स्टेप 6: पॅन क्रमांक एंटर करा, मूल्यांकन वर्ष निवडा आणि एड्रेस एंटर करा.
स्टेप 7: कॅप्चा एंटर करा आणि पुढे जा टॅबवर क्लिक करा. PAN-Aadhaar Link
हे पण वाचा :
आता Post Office च्या लहान बचत योजनांवरील व्याजदर देखील वाढणार !!!
Eoin Morgan : इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार लवकरच घेणार निवृत्ती !!!
Gold Price Today :सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर पहा
Bank Holidays : जुलैमध्ये तब्ब्ल 14 दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा
‘या’ Multibagger Stocks ने एका वर्षात गुंतवणूकदारांना मिळवून इतके पैसे !!!